सुडौल शरीरासाठी व्यायाम हा फार महत्वाचा असतो. पण सगळ्यांनाच जीममध्ये जाऊन व्यायाम करणे शक्य होत नाही. जर तुम्हाला जीममध्ये जाऊन व्यायाम करणे शक्य होत नसेल तर तुम्ही काही व्यायामप्रकार घरीही करु शकता.‘एरोबिक्स’ (Aerobic) हा प्रकारही त्यातलाच आहे. वजन कमी करण्यापासून ते तुम्हाला लवचिक बनवण्यापर्यंत एरोबिक्स फायदेशीर आहे. तुम्हालाही शरीर जड झाल्यासारखे वाटत असेल शरीरात उर्जा टिकून राहावी म्हणून तुम्ही ही काही सोपे व्यायामप्रकार करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही ‘एरोबिक्स’ (Aerobic) चे सोपे प्रकार करुन पाहायला हवेत. आज आपण जाणून घेऊया ‘एरोबिक्स’ (Aerobic) विषयी सगळे काही.
एरोबिक्स म्हणजे काय? (What Is Aerobic Exercise)
तुम्ही ‘एरोबिक्स’ हा शब्द नक्कीच ऐकला असेल. ज्या व्यायामप्रकारात जास्त ऑक्सिजन वापरला जातो. त्याला एरोबिक्स असे म्हणतात. एअरोबिक्स या व्यायामप्रकारात दोरीच्या उड्या, धावणे, चालणे, पोहणे, सायकलिंग, फुटबॉल, टेनिस, डोंगर चढणे असे प्रकार येतात. हे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला उर्जा लागते. तुमचे हृदय आणि फुफ्फुस यामध्ये जास्त काम करते. यात तुम्हाला खूप दम लागतो. पण हा व्यायाम केल्यानंतर तुमचे शरीर तुम्हाला हलके वाटते. वजन कमी करण्यास हा व्यायामप्रकार मदत करतो त्यामुळे कोणत्याही मशीनचा वापर न करता एक्ससरसाईज केले जातात.

No comments:
Post a Comment