Pages - Menu

Thursday, June 18, 2020

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार व्यायामाचा एक प्रकार


व्यायामाचा आणि उपासनेचा एक प्रकार. याने माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम मिळून सर्वत्र रक्ताचा पुरवठा होतो. आकुंचन-प्रसरणाच्या क्रिया सलग व सुलभ होत असल्याने हा व्यायामाचा शास्त्रोक्त प्रकार मानतात. प्राचीन काळापासून ते आजतागाय त उपासनेचा व व्यायामाचा हा प्रकार परंपरेने चालत आला आहे. त्यामागे अनेक धार्मिक समजुती व श्रद्घा आहेत.

सूर्यामुळे सृष्टीला उत्साह, उष्णता, आनंद आणि जीवन मिळत असल्यामुळे प्राचीन काळापासून हिंदू धर्मीय सूर्याला एक देवता मानतात. चलाचल सृष्टीचा सूर्य हा आत्मा आहे, असे वेदवचन आहे. भारतात धर्म आणि आरोग्य यांची सांगड घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून आढळते. त्यामुळे सूर्यनमस्कार हा एक उपासनेचा मार्ग बनलेला असावा. भारतात या आरोग्यदायक उपासनेला शास्त्रीय स्वरुप देण्याचे प्रयत्न झाले. त्यातून अनेक स्तोत्रे, संकल्प आणि पद्घती तयार झाल्या. भारतात अनेक ठिकाणी सूर्योदयाच्या पूर्वी सूर्योपासनेकरिता नित्यनेमाने नमस्कार घालणे, हे एक धार्मिक कर्तव्य मानले जाते. याला ‘अष्टांग’ वा ‘साष्टांग’ नमस्कार किंवा ‘अष्टांग दंड’ असेही म्हणतात. आबालवृद्घ, स्त्री-पुरुषांना उपयुक्त व फलदायी असा हा व्यायाम व उपासनाप्रकार आहे.

सूर्यनमस्कारासाठी स्वच्छ, शांत व हवेशीर जागा योग्य असते. त्यासाठी सु. २–३ मी. लांब आणि सु. पाऊण ते एक मीटर रुंद जागा पुरेशी असते. अंगावर सैल व हलकी वस्त्रे घालून व जमिनीवर सतरंजी वा चटई पसरुन नमस्कार घातले जातात. सतरंजी वा चटई न वापरता नुसत्या जमिनीवरही सूर्यनमस्कार घालता येतात; मात्र ती जमीन फार गुळगुळीत नसावी, जेणेकरुन त्यावरुन हातपाय घसरु नयेत. थंड पाण्याने स्नान करुन नमस्कार घालताना सूर्याचे कोवळे किरण अंगावर पडले, तर त्याचा चांगला उपयोग होतो. कोणत्याही साधनावाचून थोड्या जागेत व थोड्या वेळात पुरेसा व्यायाम मिळतो, हे सूर्यनमस्कारांचे एक वैशिष्ट्य होय.

Tuesday, June 16, 2020

भालाफेक

भालाफेक हा खेळ खेळाडूची एकाग्रता व तेज बुद्धीला आव्हान देणारा खेळ आहे. या खेळात खेळाडूला त्याचे लक्ष साध्य करताना नेहमीच मन व चित्त शांत ठेवत आपला निशाणा साधावा लागतो. या खेळातील मुख्य साधन म्हणजे भाला. हा भाला मुख्य तीन भागात विभागाला जातो. एक म्हणजे जो मुख्य भाग तो म्हणजे भाल्याचे टोक वा ज्याला पूर्वी भाल्याचा फाळ म्हणत. दुसरा भाग म्हणजे भाल्याची दांडी व तिसरा भाग म्हणजे भाल्याच्या दांडीला हातात धरण्याचा भाग ज्याला मूठ म्हणता येईल. भाल्याचे टोक धातूपासून बनवलेले असते व ते गोलाकार त्रिकोणी व निमुळते असते. हे धातूचे टोक 25 ते 33 सेंटीमीटर लांबीचे असते. भाल्याची दांडी ही बांबू अथवा धातूची असते. भाल्याची एकूण लांबी 2.60 ते 2.70 मीटर असते. तर भाल्याची दांडी हातात पकडण्यासाठी दांडीच्या मध्यावर दोरी गुंडाळून एक छानशी व मजबूत पकड वा मूठ तयार केली जाते व साधारणपणे ती 15 ते 16 सेंटीमीटर इतकी असते. ही दांडी मध्यभागी जाड व दोन्ही टोकांकडे निमुळती होत जाते.

भालाफेक करणारा खेळाडू तीस ते छत्तीस मीटर लांबीच्या पट्टीतून धावत येत भालाफेक करतो. साधारण चार मीटर अंतरावर दोन समांतर रेषा आखतात व नंतर 8 मीटर त्रिजेने दोन समांतर टोकांना पोहचेल असा कंस आखतात व त्यावर धातूची वा लाकडाची कड जमीन पातळीवर बसवावी. तिची जाडी सात सेंटीमीटरपेक्षा जास्त असून चालणार नाही व त्याला पांढऱया रंगाने रंगवून जमीन पातळीवर पक्की करतात. भालाफेक करण्यासाठी खेळाडूला त्याची एकाग्रहता व जोरदार व नियंत्रित धाव खूपच महत्त्वाची ठरते. त्यानंतर केलेली भालाफेक ही ठरविलेल्या व आखून दिलेल्या क्षेत्रातच होणे फारच महत्त्वाचे असते. भालाफेक करताना ती फेक ‘क्रॅच लाईन’च्या मागून करावी लागते. ही रेषा ओलांडली तर मात्र ती भालाफेक बाद ठरवली जाते. भाला पकडण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असून त्यापैकी अमेरिकन पकड व फिनीश पकड प्रसिद्ध आहे. यात अंगठा व तर्जनी यांच्या विळख्यात भाला धरून फेक करतो त्याला अमेरिकन पकड असे म्हणतात तर फिनीश पकडीत मध्यभागी तोल राहावा म्हणून दोरीने गुंडाळलेल्या जागी म्हणजे पकड मूठ अंगठा व मधले बोट यांनी पकडून तिरकस तळव्याच्या पोकळीत भाला धरून जोरदारपणे फेकला जातो.

जर आपण व्यावसायिक भालाफेक खेळाडू होऊ शकलो नाही तरी हा खेळ खेळल्याने काय फायदे होऊ शकतात हे पाहू. भालाफेक खेळाचा सराव केल्याने व त्यासाठी करावे लागणारे व्यायाम केल्याने आपल्या शरीरात प्रचंड ताकद तर निर्माण होतेच. त्याशिवाय आपले चित्त एकाग्र होते. आपले लक्ष नेहमीच गोग्य त्या दिशेने काम करू लागते. हातात व पायात प्रचंड ताकत निर्माण होते. आपण नेहमी तंदुरुस्त राहू शकतो व आपल्या आयुष्यात नेहमीच कार्यरत राहण्याची उमेद आपल्याला शांत बसू देणार नाही. त्यामुळे आपण नेहमीच योग्य त्या दिशेने काम करून आपले आयुष्य यशस्वी करू शकतो.

योगा

 योगा एक अशी क्रिया आहे जी नियमितपणे केल्याने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहते. योगा शरीराला सुशोभित आणि सुंदर बनविण्यासाठी खूप उपयुक्त आहे. परंतु योगा करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. योगा करण्यापूर्वी तुम्हाला आठ नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.


1] जेवणानंतर लगेच योग करू नका
सकाळी किंवा संध्याकाळी जेवणानंतर लगेचच योगा करू नका. योगा नेहमी खाल्ल्याच्या साधारण ३ तासानंतरच केला पाहिजे. याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी योगा करावा. वज्रासन हा एकमेव योग आहे जो जेवणानंतर केला जाऊ शकतो.


2] सरल आसनापासून करा सुरवात
जेव्हा आपण योगा करण्यास सुरवात करता तेव्हा सर्व प्रथम, हलके आसन निवडा. जे सहज केले जाऊ शकते आणि ज्यास शरीराची जास्त लवचिकता आवश्यक नाही.


3] योगा करण्यासाठी योग्य वेळ
योगा करण्याचा उत्तम काळ म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्तानंतर. दिवसाच्या वेळी योगाचा सराव करू नये. योगाचा अधिकाधिक फायदा सकाळी होतो.


4] योगा दरम्यान किंवा नंतर थंड पाणी पिऊ नये
योगा करताना किंवा नंतर कोणीही थंड पाणी पिऊ नये कारण या वेळी शरीर खूप गरम असते आणि जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा सर्दी होण्याची भीती  असते.


5] आजारी असतांना योगा करू नका
जर आपल्याला एखादी गंभीर समस्या होत असेल  सांधे, कंबर, गुडघे दुखत असल्यास योगासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे. तसेच योगाच्या वेळी बाथरूममध्ये जाऊ नये तर शरीरातील पाणी घामाच्या स्वरूपात बाहेर निघाले पाहिजे.


6] योगा केल्यानंतर स्नान करू नये.
एखाद्याने योगा केल्यावर लगेच आंघोळ करू नये कारण कोणत्याही व्यायामाने किंवा शारीरिक क्रियेनंतर शरीर खूप गरम होते. अशा परिस्थितीत आपण आंघोळ केल्यास थंडी व संसर्ग होण्याची भीती असते.


7] खुल्या हवेत योगा करा
योगा करतांना हे लक्षात ठेवले पाहिजे की तेथे मोकळी जागा आहे आणि ताजी हवा येते. जर हे शक्य नसेल तर रिक्त जागेत योगाभ्यास करा.


8] योगा करतांना नाजूक अवयवांची काळजी घ्या-
कमकुवत गुडघे, कंबर, मणके आणि मान यासारख्या संवेदनशील अवयवांची विशेष काळजी घ्यावी. जर या अवयवांमध्ये समस्या असेल तर हळूहळू आसनांमधून बाहेर पडा. 

🎇 न्यूझीलंड कोरोना मुक्त 🎇

.       
◾️ न्यूझीलंड कोरोना मुक्त झाल्याचं पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी जाहीर केले आहे.

◾️याबरोबरंच सर्व निर्बंध उठवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

◾️कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या जवळपास 200 देशांमध्ये लॉकडाऊन वेगवेगळ्या स्वरुपात अजूनही लागू असताना न्यूझीलंडने मात्र सर्व प्रकारचे निर्बंध उठवले आहेत.

◾️देशात कोव्हिड-19 आजाराचा एकही रुग्ण न आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

📌 न्यूझीलंडमध्ये यापुढे सोशल डिस्टंसिंग पाळण्याची गरज नाही. तसंच सार्वजनिक कार्यक्रमांनाही पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे.

◾️परदेशी नागरिकांसाठी देशाच्या सीमा मात्र अजूनही बंद असतील.

◾️न्यूझीलंडमध्ये गेल्या दोन आठवड्यात एकही कोव्हिड पॉझिटिव्ह केस आढळलेली नाही. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

AI आधारित तर्कशास्त्रीय गणन करून मुखाच्या कर्करोगाचे शक्यता वर्तवणारे साधन IASST संस्थेत विकसित

AI आधारित तर्कशास्त्रीय गणन करून मुखाच्या कर्करोगाचे शक्यता वर्तवणारे साधन IASST संस्थेत विकसित

गुवाहाटी या शहरातल्या इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) या स्वायत्त संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुध्दीमत्तेच्या आधारे (AI) तर्कशास्त्रीय गणन करून मुखाच्या कर्करोगाचे (ओरल स्क्वँमस सेल कार्सिनोमा) निदान आणि शक्यता वर्तवणारे साधन (tool) तयार केले आहे.

ठळक बाबी

🔸डॉ. लिपी बी. महंता यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या चमूने तयार केलेल्या या संगणकीय आराखड्याच्या सहाय्याने मुखाच्या कर्करोगाची प्रतवारी देखील करता येणे शक्य झाले आहे.

🔸मुखाच्या कर्करोगाबाबत देशातली स्थिती सांगणारा हा एकमेव माहितीसंच तयार करण्यात आला आहे.

🔸वर्गीकरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आधीच तयार केलेल्या अंलेक्सनेट, VGG 16, VGG 19, रेसनेट-50 या चार कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पद्धतींपैकी, प्रस्तावित CNN तंत्रासाठी योग्य असणारे मॉडेल निवडले गेले. वर्गीकरणाच्या बाबतीत रेसनेट-50 या मॉडेलने 92.15 टक्के इतका अचूकपणा दाखवला असला तरी प्रस्तावित CNN प्रारुपाने कमालीचे यशस्वी काम करत 97.5 टक्के इतकी अचूकता दाखविली.

🔸पेशींच्या सारखेपणामुळे ह्या कर्करोगातील पेशींचे वर्गीकरण करून त्याची प्रतवारी करणे पेशीविकृतीतज्ञांना देखील कठीण असते. कृत्रिम बुध्दीमत्तेच्या तंत्रज्ञानातील विकासामुळे संगणकाच्या आधारे डिजीटल प्रतिमा तयार करणे सहज साध्य झाले असून याचाच उपयोग करून कर्करोगावर वेळेवर, विविध प्रकारची गुणकारी उपाययोजना करणे शक्य झाले असून त्यामुळे पॅथॉलॉजिस्ट यांच्यावरील भार कमी होऊन या रोगाचा मुकाबला करता येणार आहे.

🔸कर्करोगाच्या सर्व प्रकारापैकी मुखाच्या कर्करोगाचे पुरुषांमधील प्रमाण 16.1 टक्के तर महिलांमध्ये 10.4 टक्के इतके असून ईशान्य भारतात हे प्रमाण लक्षणीय आहे. सुपारी आणि तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या पोकळीतील भागांत कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.

गोळाफेक -


लहान-लहान मुले दगड, गोटे लांब फेकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातूनच सुरू झालेला खेळ म्हणजे गोळाफेक.

मानवी शरीराला विविध गुण, कौशल्य व कला यांची जन्मजात देणगी मिळालेली आहे. त्यासाठी त्यांच्यात असलेल्या सुप्तगुणांना जागृत करणे खूप गरजेचे आहे. या गुणांपैकी असलेला एक गुण म्हणजे फेकणे. आपण विविध गोष्टी इकडे तिकडे फेकत किंवा भिरकावत असतो. त्यातूनच जन्माला आलेले खेळ म्हणजे गोळाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, भालाफेक. आयर्लंडमध्ये सुरूवातीला गंमत म्हणून गोल आकाराचे दगड लांब फेकण्याचा खेळ लोक खेळत असत. पण नंतर नंतर हा प्रकार खेळ म्हणून पुढे आला.

त्यानंतर तो दगड किती आकाराचा, वजनाचा असावा, जयपराजयाचे निकष काय असावेत? याचा सारासार विचार होऊन हा खेळ सुरू झाला. आयर्लंडमध्ये सुरू झालेला हा खेळ नंतर स्कॉटलंडमध्ये प्रचलित झाला व त्यावेळी आयर्लंडमध्ये व स्कॉटलंडमध्ये या खेळाचे सामने सुरू झाले. त्यानंतर अमेरिकेतसुद्धा हा खेळ पोहचला व तो तिथे प्रचंड लोकप्रियसुद्धा झाला. त्यानंतर आयर्लंडमध्ये जन्म झालेल्या गोळाफेक या खेळात कालांतराने सुधारणा होऊन त्याची नियमावली तयार केली गेली. गोळा कोणत्या धातूचा असावा, किती वजनाचा असावा, किती खेळाडू स्पर्धेत भाग घेऊ शकतात याबाबत नियमावली तयार करण्यात आली व हा खेळ प्रसिद्ध होऊ लागला. गोळाफेक या खेळामुळे शारीरिक ताकत वाढते.

या खेळात वापरला जाणारा गोळा हा लोखंडी किंवा पितळी धातूचा असतो तर त्यात शिशासारखा वजनदार धातू भरलेला असतो. पुरुष खेळाडूंसाठी १६ पौंड (७.२५७ कि. ग्रॅ.) वजनाचा गोळा वापरला जातो तर महिला खेळाडूंसाठी हाच गोळा ८ पौंड १३ औंस (४कि. ग्रॅ.) वजनाचा गोळा वापरला जातो. तर शालेय स्पर्धांमध्ये मुलांसाठी हाच गोळा १२ पौंड (५.४४३ कि. ग्रॅ.) वजनाचा वापरला जातो. पुरुष व महिलांसाठी वेगवेगळी स्पर्धा आयोजित केली जाते. ७ फूट(२.१३५ मी.) व्यासाच्या वर्तुळातून गोळाफेक करायची असते.  या वर्तुळमध्यातून ४० अंशांचा कोन असतो. या कोनातच गोळा फेकायचा असतो. स्पर्धकाने एकदा गोळा घेऊन वर्तुळात प्रवेश केला की तो वर्तुळातून बाहेर जाता कामा नये. जर तो वर्तुळाबाहेर गेला तर तो फाऊल (नियमभंग) होतो. एकदा गोळा फेकल्यावर व जमिनीवर पडल्यावर स्पर्धकाने वर्तुळाच्या मागील भागातूनच बाहेर पडले पाहिजे. भाग घेणाऱया खेळाडूंपैकी ज्या खेळाडूचा गोळा सर्वात लांब जाईल तो खेळाडू किंवा स्पर्धक विजेता होतो.

वर्तुळातून गोळा हा विशिष्ट कोनातूनच फेकावा लागतो. त्यात गोळ्याची पकड, पायांच्या विशिष्ट हालचाली व गोळाफेक व पायांची अदलाबदल असे तीन टप्पे गोळाफेकीत असतात. पायांच्या हालचालीतही दोन प्रकार असतात. एक घसरण्याची व दुसरी लंगडण्याची क्रिया. त्यावेळी गोळा हा विशिष्ट पद्धतीने हातात धरून गळपट्टीच्या हाडाजवळून फेकावा लागतो. या खेळात एकावेळी ८ किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले असल्यास प्रत्येक खेळाडूस तीन संधी देऊन अंतिम आठ खेळाडू निवडले जातात व त्या आठ जणांना पुन्हा तीन संधी देऊन सर्वोत्कृष्ट लांब गोळा फेकणाऱया खेळाडूला विजेता घोषित केले जाते. गोळाफेक हा अतिशय सुंदर असून तो खेळ जगभर खेळला जात असला व आपली लोकसंख्या १२५ करोडपेक्षा जास्त असली तरी या खेळात आपला देश खूपच मागे आहे.

धावणे

धावणे सुरु करण्याआधी वार्म अप करायला विसरू नका. कमीत कमी ५ मिनिटे तरी वार्म अप करा.

धावणे सुरु करण्याआधी तुमचे ध्येय निश्चीत करा. तुम्ही किती किलोमीटर धावणार आहात आणि किती वेगाने धावणार आहात ते ठरवा.

पहिल्यांदा धावायला सुरवात करताना कमी वेगाचे आणि अंतराचे ध्येय ठेवा कारण तुमचा अंदाज चुकू शकतो. एकदा तुम्हाला तुमच्या वेगाचा आणि क्षमतेचा अंदाज आला कि नंतर ध्येय वाढवा.

तुमचा वेग आणि कापलेले अंतर मोजण्यासाठी तुम्ही मोबाईलवर एखादा अॅप डाऊनलोड करू शकता. त्यामुळे तुम्हाला धावलेले अंतर आणि त्यासाठी लागलेला वेळ याची नोंद ठेवता येईल.

तुम्ही धावत असताना तुम्ही मॅरेथॉनसाठी धावत असल्याचे समजून धावा. आभासी शर्यतीमुळे तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यास मदत होते.

एकदा तुम्हाला एक ठराविक अंतर धावायची सवय झाली कि, नंतरच्या आठवड्यात तुम्ही थोडे अजून अंतर वाढवा. पण लक्षात ठेवा कि हे अंतर पाहिल्या आठवड्याच्या अंतराच्या दहा टक्के पेक्षा जास्त असू नये.

सकाळी धावणे नेहमीच उत्तम असते पण सकाळचे न जमल्यास दिवसा किंवा संध्याकाळी सुद्धा धावू शकता. पण काहीही खाल्यानंतर दोन तास धावू नये नाहीतर पोटात दुखणे, उलटी होणे अश्या प्रकारचे त्रास होऊ शकतात.

धावायला सुरवात करताना एकदम जोरात धावणे सुरु करू नका त्याऐवजी सुरवातीला जोरात चाला किंवा हळूहळू पळा आणि १० मिनिटानंतर वेग वाढवा. थांबताना सुद्धा एकदम धावणे न थांबवता हळूहळू वेग कमी करा नाहीतर शिरा दुखणे, मळमळ किंवा चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात.

जर धावताना वरीलप्रमाणे काही त्रास झाला तर दोन दिवस विश्रांती घेऊन नंतर धावायला सुरवात करावे.

जर सलग दोन दिवस आराम घेतल्यानंतर सुद्धा दुखत असेल तर मात्र तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

धावणे सुरु करायच्या आधी काही खाऊ किंवा पिऊ नये.

तुम्ही धावण्याचा व्यायाम करत असला तर इतर कठीण व्यायाम करणे टाळा.

हवा ज्या दिशेने वाहत आहे त्या दिशेने धावलात तर तुम्हाला लवकर दम लागणार नाही.

तसेच ज्या दिशेने वाहने येत आहेत त्याच्या विरुध्द दिशेने धावा त्यामुळे तुम्हाला समोरून येणारी वाहने दिसतील आणि अपघात होणे टळेल.

धावण्याचा वेग एक समानच ठेवला पाहिजे.

रात्री पुरेशी झोप घ्या.

जेवणात कर्बोदकांसोबत पुरेसे प्रोटीन्स सुद्धा घेतले गेले पाहिजेत.