Pages - Menu

Tuesday, June 16, 2020

AI आधारित तर्कशास्त्रीय गणन करून मुखाच्या कर्करोगाचे शक्यता वर्तवणारे साधन IASST संस्थेत विकसित

AI आधारित तर्कशास्त्रीय गणन करून मुखाच्या कर्करोगाचे शक्यता वर्तवणारे साधन IASST संस्थेत विकसित

गुवाहाटी या शहरातल्या इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) या स्वायत्त संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुध्दीमत्तेच्या आधारे (AI) तर्कशास्त्रीय गणन करून मुखाच्या कर्करोगाचे (ओरल स्क्वँमस सेल कार्सिनोमा) निदान आणि शक्यता वर्तवणारे साधन (tool) तयार केले आहे.

ठळक बाबी

🔸डॉ. लिपी बी. महंता यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या चमूने तयार केलेल्या या संगणकीय आराखड्याच्या सहाय्याने मुखाच्या कर्करोगाची प्रतवारी देखील करता येणे शक्य झाले आहे.

🔸मुखाच्या कर्करोगाबाबत देशातली स्थिती सांगणारा हा एकमेव माहितीसंच तयार करण्यात आला आहे.

🔸वर्गीकरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आधीच तयार केलेल्या अंलेक्सनेट, VGG 16, VGG 19, रेसनेट-50 या चार कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पद्धतींपैकी, प्रस्तावित CNN तंत्रासाठी योग्य असणारे मॉडेल निवडले गेले. वर्गीकरणाच्या बाबतीत रेसनेट-50 या मॉडेलने 92.15 टक्के इतका अचूकपणा दाखवला असला तरी प्रस्तावित CNN प्रारुपाने कमालीचे यशस्वी काम करत 97.5 टक्के इतकी अचूकता दाखविली.

🔸पेशींच्या सारखेपणामुळे ह्या कर्करोगातील पेशींचे वर्गीकरण करून त्याची प्रतवारी करणे पेशीविकृतीतज्ञांना देखील कठीण असते. कृत्रिम बुध्दीमत्तेच्या तंत्रज्ञानातील विकासामुळे संगणकाच्या आधारे डिजीटल प्रतिमा तयार करणे सहज साध्य झाले असून याचाच उपयोग करून कर्करोगावर वेळेवर, विविध प्रकारची गुणकारी उपाययोजना करणे शक्य झाले असून त्यामुळे पॅथॉलॉजिस्ट यांच्यावरील भार कमी होऊन या रोगाचा मुकाबला करता येणार आहे.

🔸कर्करोगाच्या सर्व प्रकारापैकी मुखाच्या कर्करोगाचे पुरुषांमधील प्रमाण 16.1 टक्के तर महिलांमध्ये 10.4 टक्के इतके असून ईशान्य भारतात हे प्रमाण लक्षणीय आहे. सुपारी आणि तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या पोकळीतील भागांत कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.

No comments:

Post a Comment