जिमला गेल्यावर वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग बिलकुल चुकवू नये…
अनेक जण वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग करायला कंटाळतात, पण असे करणे शरीरासाठी धोकायादक ठरू शकते म्हणून कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी किमान ५ मिनिटे वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग जरूर करावे. तसेच कोणताही व्यायाम प्रकार एकदम करू नये. सावकाश सुरुवात करून मगच त्यात वाढ करावी.
इतरांसारखे करायला जाऊ नका.
जिम मधील दुसरे कुणीतरी ज्या प्रकारे व्यायाम करते, जे व्यायाम करते त्याची कॉपी करायला जाऊ नका. आधी ट्रेनरचा सल्ला घेऊनच मग काय करायचे ठरवा. कारण इतरांना जे जमते ते तुम्हाला जमेलच असे नाही. आणि त्याची तुमच्या शरीराला खरंच आवश्यकता आहे का याचाही विचार करायला हवा.
जास्तीचे वजन उचलण्याचा प्रयत्न…
काही दिवस व्यायाम केला की आपण अजून काय करू शकू याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. आपली ताकद किती वाढली हे ही जाणून घ्यावे वाटते. अशावेळी अजून किती जास्त वजन आपण उचलू शकतो हे तपासण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यासाठी सरावापेक्षा कितीतरी जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न होतो.
याने तुम्हाला कितीही आनंद होणार असला तरी त्यापेक्षा जास्त दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे उगाच स्वतःला अजमावून बघण्याच्या फंदात पडू नका.
उपाशीपोटी जिम करू नका…
ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी इंधनाची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे जिम करताना तुमच्या शरीराला उर्जेची आवश्यकता असते. जी तुम्हाला अन्नातून मिळते. म्हणूनच अगदीच उपाशीपोटी किंवा खुप वेळाच्या उपवासानंतर व्यायाम करू नये. त्याने अधिक थकवा जाणवण्याची प्रसंगी चक्कर वगैरे येण्याचीही शक्यता असते.
म्हणूनच व्यायामापूर्वी पोटात काहीतरी असावे. परंतु हा आहार देखील एकदम हलका असावा. जड अन्न खाऊ नये. शिवाय खाऊन लगेच व्यायाम न करता ते पचण्यास थोडा वेळ देऊन मग व्यायामास सुरुवात करावी.

आता पुढच्या वेळेस जिमला जाताना या गोष्टींचे जरूर पालन करा आणि शरीरावर होऊ शकणारे संभाव्य दुष्परिणाम टाळा
No comments:
Post a Comment